September 8, 2024 12:52 pm

Home » मध्य प्रदेश » इंदौर » लोकसभा निवडणुकीबाबत आरएसएस भाजपची नागपूर बैठक विदर्भातील सर्व लोकसभा मतदारसंघांचा आढावा महाराष्ट्र पॉलिटॉक्स मराठी बातम्या

लोकसभा निवडणुकीबाबत आरएसएस भाजपची नागपूर बैठक विदर्भातील सर्व लोकसभा मतदारसंघांचा आढावा महाराष्ट्र पॉलिटॉक्स मराठी बातम्या

81 Views

नागपूर: लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) जसजशा जवळ येत आहेत तसतसे भाजपने (BJP) वेगाने राजकीय हालचाली सुरू केल्याचं दिसून येतंय. मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपने कंबर कसली असून राज्यातून 45 पेक्षा जास्त खासदार निवडणून आणण्याचं ध्येय ठेवलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपुरात आज संघ परिवार (RSS)आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सहा तास चर्चा झाली. त्यामध्ये विदर्भातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आल्याची माहिती आहे. 

संघ आणि भाजप पदाधिकाऱ्यांची सुमारे सहा तास चाललेली विशेष बैठक संपली आहे. विदर्भातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा या बैठकीत घेण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. रविवारी पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला होता. आता विदर्भातील मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला आहे. त्या आधी राज्यभर महायुतीचे मेळावेही घेण्यात येत आहेत.

भाजपची बलस्थानं काय? कच्चे दुवे काय? याचा सखोल आढावा

नागपुरातील रेशीम बाग परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात सोमवारी सकाळपासून ही बैठक सुरू होती. या बैठकीत विदर्भातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आल्याची माहिती आहे. प्रत्येक लोकसभा क्षेत्रानुसार तिथले वर्तमान राजकीय समीकरण काय? भाजपची स्थिती कशी आहे? निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपचे बलस्थान काय? कोणत्या कच्च्या दुव्यांकडे लक्ष द्यायचे आहे? याचा सखोल आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आल्याची माहिती आहे.

22 जानेवारीला काय करावं याचाही आढावा 

विशेष म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांच्या स्थितीचा टप्प्याटप्प्याने, ठिकठिकाणी बैठक घेऊन आढावा घेण्यात आला होता. त्याच पद्धतीने यावर्षीही लोकसभा निवडणुकांपूर्वी संघ परिवारातील सर्व संघटनांना एकत्रित बसवून आढावा घेतला जात आहे.

दरम्यान 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होत असताना सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी काय करावे, ठिकठिकाणी राम मंदिराचा जल्लोष करण्यासाठी काय नियोजन आहे याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे.

महायुतीचे राज्यभर मेळावे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून राज्यभर मेळावे घेण्यात येत आहेत. यामध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत महायुतीतील स्थानिक पक्षांचाही सहभाग आहे. महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा मात्र अद्याप झालेली नाही. 

ही बातमी वाचा: 

Source link

hipravahnetwork
Author: hipravahnetwork

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This