September 8, 2024 11:15 am

Home » मध्य प्रदेश » इंदौर » तारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिलीप जोशी यांनी जेठा जी बबिता किधर है व्हिडीओ व्हायरल करणार्‍या पॅप्सला दिलखुलास उत्तर दिले आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिलीप जोशी यांनी जेठा जी बबिता किधर है व्हिडीओ व्हायरल करणार्‍या पॅप्सला दिलखुलास उत्तर दिले आहे.

80 Views

Dilip Joshi: छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या कार्यक्रमामध्ये जेठालाल ही भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. दिलीप जोशी यांनी पत्नी जयमाला जोशी यांच्यासोबत आयरा आणि नुपूर यांच्या रिसेप्शनला हजेरी लावली. सोशल मीडियावर दिलीप यांचे रिसेप्शन सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामधील एका व्हिडीओमध्ये दिलीप हे फोटोग्राफर्ससोबत संवाद साधताना दिसत आहेत. 

जेठालालच्या पत्नीसमोर फोटोग्राफर्सचा प्रश्न

दिलीप जोशी जेव्हा त्यांची पत्नी जयमाला यांच्यासोबत फोटोसाठी पोज देण्यासाठी आले तेव्हा फोटोग्राफर्सनी त्यांना ‘बबिताजी कुठे आहेत?’ असा प्रश्न त्यांना विचारला. या प्रश्नाचं दिलीप यांनी दिलेल्या उत्तर ऐकल्यानंतर सर्व फोटोग्राफर्स हसायला लागले.

दिलीप जोशींचे उत्तर ऐकल्यानंतर खळखळून हसले फोटोग्राफर्स

‘बबिताजी कुठे आहेत?’ हा प्रश्न फोटोग्राफर्सनं विचारल्यानंतर दिलीप जोशी म्हणाले, “त्यांच्या घरी आहेत, त्या” दिलीप जोशी यांचे उत्तर ऐकल्यानंतर जयमाला  आणि फोटोग्राफर्स हसायला लागले.

पाहा व्हिडीओ:


‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेला मिळाली प्रेक्षकांची पसंती

अभिनेत्री मुनमुन दत्तानं ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत बबिता ही भूमिका साकारली आहे. मालिकेतील बबिता आणि जेठालाल या भूमिकांना प्रेक्षकांना विशेष पसंती मिळाली.  28 जुलै 2008  रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.

 दिलीप जोशी यांनी ‘मैने प्यार किया’,  ‘वन 2 का 4’, ‘ढूंढते रह जाओगे’, ‘वॉट्स योर राशि’, ‘खिलाड़ी 420’, ‘हमराज’ आणि ‘फिराक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत असते.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Dilip Joshi: थाटात पार पडला जेठालालच्या मुलाचा लग्नसोहळा, कोण आहे दिलीप जोशींची रिअल लाईफ सून उन्नती? जाणून घ्या

 

 

Source link

hipravahnetwork
Author: hipravahnetwork

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This