उमेश चक्कर, हिंगोली
वारसा समाजसेवेचा, संकल्प निस्वार्थ सेवेचा याप्रमाणे मागील सोळा वर्षापासून भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष उज्वलाताई तांभाळे पाटील यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर जवळच असलेल्या सारंगवाडी माळरानावर शेकडो वर्षापासूनच्या सुरू असलेल्या सारंग स्वामी यात्रेत भाजी बरोबरच पोळीचा आस्वाद घेता यावा या हेतूने मागील सोळा वर्षापासून पोळी महाप्रसाद वाटपाची परंपरा उज्वलाताई तांभाळे यांनी अखंडित सुरू ठेवली. यंदाही उज्वलाताई तांभाळे पाटील यांच्याकडून पोळीचा महाप्रसाद दिला जाणार आहे. यासाठी तब्बल दहा क्विंटलच्या जवळपास पिठाची पोळी करण्याचं काम सुरू आहे. यासाठी 30 महिला पोळी बनवण्यासाठी तयारीला लागल्या असून येथे होणाऱ्या भाजीच्या महाप्रसादाबरोबरच आता येथे येणाऱ्या भक्तांना पोळीचा महाप्रसाद देखील दिला जाणार आहे. या यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहुन महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष उज्वलाताई तांभाळे पाटील यांनी केले आहे.