December 12, 2024 4:07 am

Home » Uncategorized » आमदार राजूभैया नवघरेंच्या प्रयत्नातून रस्त्याचं भाग्य उजळलं!

आमदार राजूभैया नवघरेंच्या प्रयत्नातून रस्त्याचं भाग्य उजळलं!

89 Views

उमेश चक्कर, हिंगोली

वसमत विधानसभेचे आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या हस्ते वसमत विधानसभेतील निळोबा चिंचोली येथे निळोबा चिंचोली ते उखळी रस्त्याच्या कामाचे यानंतर जलालपुर ते बेरूळा हा रस्ता कामाचे, त्याचबरोबर लांडाळा, सावळी खुर्द ते सावळी बुद्रुक, केळी या दुरुस्ती कामाचे तसेच साळना ते अनखळी तथा इतर ठिकाणची भूमिपूजनही आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते पार पडली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे, उपसभापती सचिन भोसले, संजय दराडे, आदित्य आहेर, बाबाराव राखुंडे, भगवानराव इघारे, प्रवीण टोम्पे, भानुदासराव गीते, माऊली ढोबळे, गोपाल मगर ,सुभाष कावरे, गजानन सांगळे ,राजू गरड यासह परिसरातील गावचे सरपंच, कार्यकर्ते ग्रामस्थ आदींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यादरम्यान आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला. यानंतर बेलमंडळ येथे महादेवाचा अभिषेक करून विकास कामाचे भूमिपूजन केले. उखळी, माथा, उंडेगाव भागातील रस्त्यांना कोट्यावधी रुपये निधी देत परिसरातील ग्रामस्थांना दळणवळणासाठी हा मार्ग सुखकर होणार आहे. आमदार राजूभैया नवघरे यांच्या प्रयत्नातून ही रस्ते होणार असल्याने गावागावातून नागरिकांनी आमदार राजूभैया नवघरे यांच्या बद्दल समाधान व्यक्त केलं जात आहे. अनेक ठिकाणी आमदार राजूभैया नवघरे यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कारही करण्यात आला आहे.

hipravahnetwork
Author: hipravahnetwork

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This