शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक
प्रतिनिधी-उमेश चक्कर, हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील उखळी येथील शॉर्टसर्किटमुळे एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली दरम्यान यामध्ये संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. यामध्ये अगोदर घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला त्यानंतर घरातील असलेल्या विद्युत तारेच्या शॉर्टसर्किटमुळे पुन्हा घराला भीषण आग लागली. आगीचा भडका पाहता ग्रामस्थांनी अग्निशमन दलाला बोलावले तोपर्यंत घरातील असलेले फ्रिज, गॅस सिलेंडर याचाही यामध्ये स्फोट झाला. उखळी येथील मारुती मुंजाजी मांडे असं या घरमालकाचं नाव आहे. यामध्ये तब्बल पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. अग्निशामन दलाने शेवटी आग विझवली पण यामध्ये तोपर्यंत लाखो रुपयाचे नुकसान मारुती मुंजाजी मांडे परिवाराचे झाले आहे. शुक्रवारी 19 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे कुटुंबांना पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी केली जात आहे.