प्रतिनिधी -हिंगोली
कुरूंदा ठाणेदारांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापुर येथील एका अल्पवयीन विद्यार्थीनीची छेड काढल्या प्रकरणी युवकास जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर दोन गट समोरासमोर समोर आल्याने वातावरण तापले होते. ज्याची माहिती मिळताच कुरूंदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही समाजातील लोकांची समजुन काढत वातावरण शांत केले. या प्रकरणी कुरूंदा पोलिस ठाण्यात एका आरोपी विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, शिरडशहापुर येथील एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून एक युवक तिला त्रास देत होता. 19 जानेवारी रोजी सायंकाळी मुलीच्या घराजवळ व 20 जानेवारी रोजी दुपारी जिल्हा परिषद शाळेजवळ मुलीची छेड काढत विनयभंग केला या वेळी सदर बाब मुलीने घरी सांगितली. त्यानंतर सदर युवकांच्या नातेवाईक यांनी मुलीच्या घरासमोर गर्दी केली होती. दोन गट आमने सामने आल्याने वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी घटनेची माहिती कुरूंदा पोलिसांना मिळाल्यानंतर कुरूंदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन. दोन्ही गटातील जमावाला पांगवले व तात्काळ मुलीच्या वडिलाच्या फिर्यादी वरून आरोपी युवका विरूद्ध विनयभंग तथा पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी ठाणेदार मोरे यांनी आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन सदर आरोपी अल्पवयीन असल्याने बालन्याय मंडळाकडे पाठवण्यात आले असल्याची माहिती ठाणेदार मोरे यांनी दिली आहे