September 8, 2024 12:29 pm

Home » हिंगोली » राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त शेवाळा येथे शोभायात्रा

राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त शेवाळा येथे शोभायात्रा

105 Views

प्रतिनिधी -उमेश चक्कर, हिंगोली

भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रम शेवाळा येथे संपन्न

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. शेवाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून सोमवारी सकाळी नऊ वाजता या शोभायात्रेला सुरुवात झाली. दुपारी एक वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तर सायंकाळी आरती त्यानंतर कारसेवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर तथा प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेसमोर दीपोत्सव साजरा करीत तथा फटाक्याची आतिषबाजी करत भक्तीमय वातावरणात ही भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने राम भक्तांची उपस्थिती होती या शोभायात्रा कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याच आवाहन देखील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा रामभक्त महेश गोविंदवार यांनी केले होते. या भक्तीमय वातावरणात श्रीराम प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त शेवाळा गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी रामल्लाची भक्तिमय गीते लावत भक्तिमय वातावरणात अनेकांनी ठेका धरल्याच सुद्धा पाहायला मिळालं.

hipravahnetwork
Author: hipravahnetwork

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This