575 Views
दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारी मध्ये एकाचा मृत्यू धक्कादायक घटना
वसमत तालुक्यातील कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीतील चोंडी स्टेशन येथे भर रस्त्यात आज सकाळी 24 जानेवारी रोजी दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
यावेळी दोन गटात भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनास्थळी जमावाने मोठी गर्दी केली त्यानंतर जमावाने लगतच असलेल्या एका घरावर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ कुरुंदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे.