राजकीय वृत्तवेध
हिंगोली लोकसभा लढवण्यासाठी मतदारसंघात अनेकजण जनसंपर्क वाढवण्यासाठी मतदारसंघात फिरू लागले आहेत. हा मतदारसंघ आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे 2024 लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याची अनेकांकडून तयारी सुरू झाली आहे. पण माझे दुःख कोणाला सांगू मला लोकसभा लढवायची आहे अशीच काहीशी गत एका भारतीय जनता पार्टी पक्षातील भावीखासदाराबद्दल निर्माण झाली आहे. मतदार संघात अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत असताना मलाही खासदारकीचे तिकीट मिळावे माझेही पक्षात चांगले वजन आहे पण? हि खदखद व्यक्त कोणापाशी करावी, लोकसभा मतदारसंघात खासदारकीच्या पार्श्वभूमीवर फिरू लागलेले भावी उमेदवार मला मात्र साहेब-साहेब करीत गाडीत घेऊन फिरू लागलेत.पण माझे दुःख कोणाला सांगू मलाही लोकसभा लढवायची आहे. सध्या मोदी सरकारचे वारे वाहू लागले असताना या वाऱ्यात माझा विचार पक्षाने करावा असेही या नेत्याला वाटत असावं?. मी कोणाकडे व्यक्त होऊ पण डझनभराच्या वर उमेदवार महायुतीत अगोदरच कामाला लागले आहेत माझा फोटोही सर्वजण बॅनरवर लावत आहेत.पण माझे दुःख कोणाला सांगू मलाही लोकसभा लढवायची आहे. अशी काहीशि गत या नेत्याची झाली आहे. सदरील नेता हा आतापर्यंत व्यक्त झाला नाही प्रसार माध्यमांनीही त्या लोकसभेच्या यादीत कधी फोटो लावत माझं नावही लावलं नाही अशीच काहीशी गत या नेत्याची झाली आहे. नुकताच हिंगोलीत काही दिवसापूर्वी महायुतीचा मेळावा संपन्न झाला सर्वांची भाषणे झाली या सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दुःखी असलेल्या भाविखासदाराच देखील भाषण झालं पण लगेच त्यांनी कार्यक्रमातून मला काम आहे असे सांगत काढता पाय घेतला. कारण पहिलेच डझनभराच्या वर भावी खासदार या मंचावर पाहायला मिळाले.आता या दुःखी भावी खासदाराची चर्चा जोरात सुरू आहे पण आजपर्यंत कोणालाही त्यांचे दुःख त्यांनी सांगितले नाही कदाचित त्यांच्या जवळचा कोणी त्यांना सापडला नसेल, प्रेक्षकांनाही प्रश्न पडला असेल की ही व्यक्ती कोण असेल पण आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी पक्षाकडून लोकसभेची जयत तयारी करणाऱ्या या उमेदवारांना हा नेता कोण याबद्दल माहिती असल्याच्या चर्चा आहेत. लोकसभा मतदारसंघाच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत असलेला हा न व्यक्त झालेला दुखी नेता मागील दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा आमदार असल्याचं बोललं जातंय.