September 8, 2024 11:09 am

Home » राजकारण » आगामी लोकसभेत खासदार हेमंत पाटील पडणार…!!

आगामी लोकसभेत खासदार हेमंत पाटील पडणार…!!

270 Views

प्रतिनिधी -उमेश चक्कर हिंगोली

योगी शाम भारती महाराज यांचे खळबळजनक वक्तव्य..

हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांच्या बद्दल नागरिक व मतदारांमध्ये तिव्र नाराजी असुन त्यांनी यावेळी थांबायला पाहीजे व त्यांनी अट्टाहास करून पक्षाने उमेदवारी दिल्यास हेमंत पाटील लोकसभा निवडणुकीत पडणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य भाजपाचे मिशन मोदी अगेन पिएम आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महंत योगी शाम भारती महाराज यांनी हाय प्रवाह नेटवर्क या डिजिटल वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.
यावेळी पुढे बोलतांना योगी शाम भारती महाराज म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा उमेदवार म्हणुन मी प्रबळ दावेदार होतो.माझे तिकीट फिक्स होते परंतु हिंगोली लोकसभेची जागा शिवसेनेला सुटल्याने खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळाली व तेरा दिवसात ते खासदार झाले. मी मागील आठ ते नऊ वर्षांपासून पक्षाचे काम करत असुन लोकांच्या समस्या आडीअडचणी सोडवत आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहे. हिंगोली लोकसभेची जबाबदारी केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्या कडे असल्याचे त्यांनी सांगितले. हिंगोली लोकसभेत ईच्छूक असलेल्या भाजपाच्या सर्व उमेदवारांमध्ये मी जेष्ठ आहे. हिंगोली लोकसभेची जागा हेमंत पाटील हारणार अशी लोकांमध्ये चर्चा आहे.
2024 मध्ये हिंगोली लोकसभेची जागा भाजपला सुटल्यास मीच प्रबळ दावेदार आहे. भाजपा कडून मि निवडणूक लढवणार असल्याचे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. तसेच खासदार हेमंत पाटील यांच्या बाबतीत बोलतांना त्यांच्या विषयी कमालीची नाराजी लोकांमध्ये व मतदारांमध्ये आहे.
त्यांना तिकीट मिळाल्यास त्यांचा पराभव निश्चित असल्याचे शाम भारती यांनी सांगितले. माझे कार्य काय आहे मी बोलण्यापेक्षा जनताच सांगेल. माझ्या सारखा सन्याशी महाराज तळागळा पर्यंत पक्षाचे कार्य नेतो. हिंगोली लोकसभा क्षेत्रातील मतदार यावर्षी बाहेर चा उमेदवार नाकारत असल्याचेही त्यांनी बोलुन दाखवले. वरिष्ठांनी माझा पुर्ण फालोअप घेतला असुन देवेंद्रजी मला नावानीशी ओळखतात. योगी श्याम भारती महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघात चर्चेला उधाण आल आहे.

hipravahnetwork
Author: hipravahnetwork

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This