91 Views
काँग्रेस नेते अंकुश देवसरकरांनी साधला अनेकांशी संवाद
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे श्री खंडोबा यात्रा महोत्सव सुरू आहे. दरम्यान मागील 29 जानेवारी रोजी कुस्त्यांचे भव्य सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते तर 2 फेब्रुवारी शुक्रवार रोजी जंगी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान या शंकरपट स्पर्धेचे उद्घाटन हिंगोली लोकसभेचे काँग्रेसचे नेते डॉक्टर अंकुश देवसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, भास्करराव बेंगाळ, सुनील पाटील गोरेगावकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी काँग्रेस नेते डॉक्टर अंकुश देवसरकर यांनी अनेकांशी संवाद साधल्याच पाहायला मिळालं.