September 8, 2024 1:11 pm

Home » Uncategorized » हिंगोलीच्या उद्धव ठाकरे शिवसेनेत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती मात्र कही खुशी कही गम..!

हिंगोलीच्या उद्धव ठाकरे शिवसेनेत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती मात्र कही खुशी कही गम..!

1,156 Views

प्रतिनिधी- उमेश चक्कर,हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यासंदर्भाचे अधिकृत वृत्त शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकात प्रकाशित करण्यात आले आहे. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे काहींना नवीनच पक्षात काम करण्याची संधी मिळाली आहे काहींचे काम पाहून त्यांना पद दिल्याच्या चर्चा आहेत तर काहींचे मानाचे पद कमी करत मोठे दिसण्यापुरते पद देण्यात आले आहे त्याचबरोबर काही पदाधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र कमी करण्यात आले आहे तथा काहींना नवीनच संधी दिली गेली असल्याने हिंगोली जिल्ह्यातल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही खुशी कही गम अशीच काही स्थिती निर्माण झाली आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या आदेशाने हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत नित्या पुढील प्रमाणे.

विनायक भिसे सह संपर्कप्रमुख कार्यक्षेत्र हिंगोली कळमनुरी औंढा नागनाथ, अजय उर्फ गोपू पाटील जिल्हाप्रमुख कार्यक्षेत्र हिंगोली कळमनुरी औंढा नागनाथ, गणेश शिंदे उपजिल्हाप्रमुख कार्यक्षेत्र हिंगोली सेनगाव, परमेश्वर मांडगे विधानसभा प्रमुख कार्यक्षेत्र हिंगोली विधानसभा, चंद्रकांत देशमुख विधानसभा प्रमुख कार्यक्षेत्र कळमनुरी विधानसभा, विठ्ठल चोतमाल प्रवक्ता कार्यक्षेत्र हिंगोली जिल्हा, शंकरराव घुगे उपजिल्हा संघटक कार्यक्षेत्र कळमनुरी विधानसभा, बाळासाहेब गावंडे तालुका संघटक कार्यक्षेत्र कळमनुरी विधानसभा, पंढरीनाथ ढाले तालुका संघटक कार्यक्षेत्र हिंगोली तालुका, प्रकाशचंद्र पाठक जिल्हा संघटक हिंगोली कामगार आघाडी, कैलास खिल्लारे जिल्हा संघटक हिंगोली दलित आघाडी, अब्दुल्ला पठाण जिल्हा संघटक हिंगोली अल्पसंख्यांक आघाडी, शेख एहतेशाम शेख मुख्तार जिल्हा संघटक हिंगोली वाहतूक सेना, अशोक करे तालुका समन्वयक कळमनुरी तालुका, विष्णू जाधव तालुका सचिव औंढा नागनाथ तालुका, जानकीराम जगताप तालुका सहसचिव कळमनुरी तालुका, दिलीपराव शिंदे उप तालुका संघटक कळमनुरी तालुका, अमोल पाईकराव तालुका संघटक हिंगोली कळमनुरी विधानसभा दलित आघाडी, कीर्ती लदनीया जिल्हा संघटक हिंगोली, डॉक्टर रेणुका पतंगे जिल्हा संघटक वसमत औंढा नागनाथ, सुमनबाई वाईकर उपजिल्हा संघटक कळमनुरी विधानसभा, मंगलाताई कांबळे तालुका संघटक हिंगोली तालुका, कमलबाई चरखा तालुका संघटक कळमनुरी तालुका, गंगासागर धुळे शहर संघटक कळमनुरी शहर , अशा विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून अनेकांना नवीन संधी मिळाली आहे तर अनेकांच्या कार्यक्षेत्रात तथा पदामध्ये फेरबदल झाल्याने काही खुशी कभी गम असं चित्र पाहायला मिळत आहे.

hipravahnetwork
Author: hipravahnetwork

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This