रेसन्स इंग्लिश स्कूल येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न
प्रतिनिधी -उमेश चक्कर हिंगोली
जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील नामांकित रेसन्स इंग्लिश स्कूल या इंग्रजी शाळेत 18 फेब्रुवारी वार रविवार रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, संस्थेचे अध्यक्ष मिलिंदभाऊ यंबल यांचे वडील स्वर्गीय राजकुमार नागोबा यंबल यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक गोरगरिबांना मदत तथा निराधारांना आधार देत, सामाजिक कार्यात त्यांचा मोठा वाटा असल्याने शिरडशहापूरच नव्हे तर हिंगोली जिल्हा भरात त्यांच मोठ नाव असताना आज 18 फेब्रुवारी रोजी स्वर्गीय राजकुमार नागोबा यांच्या पुण्यतिथीचे निमित्त साधत स्वर्गीय राजकुमार नागोबा यंबल यांच्या पुतळ्याचे अनावरण तथा या विज्ञानाच्या युगात सुसज्ज अशा प्रयोगशाळेचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, कार्यक्रमाचे उद्घाटक माजी खासदार अँड शिवाजीराव माने, प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहकार मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा, साखर संघाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष उज्वलाताई तांभाळे, माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मुनिर पटेल, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतीश सोमानी, वसमत भाजपा शहराध्यक्ष शिवाजी आडलिंगे, शिरडशहापूरचे सरपंच यशवंत उर्फ जितू रावले, सारंगवाडीचे सरपंच प्रभुलिंग स्वामी महाराज,अभय कुमार यंबल यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाप्रसंगी स्वर्गीय राजकुमार नागोबा यंबल यांच्या जीवन चरित्रावर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, माजी खासदार शिवाजी माने, माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा, जयप्रकाश दांडेगावकर, उज्वलाताई तांभाळे, मुनीर पटेल यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वर्गीय राजकुमार नागोबा यांच्या विषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. आजची पिढी ही वडिलांना तथा थोरा मोठ्यांना विसरत चालल्याची भावना यावेळी व्यक्त करत वडिलांचा पुतळा उभा करत त्यांचे विचार त्यांच्या कार्याचा ठसा अजरामर ठेवण्याचे यंबल कुटुंबीयांचे प्रयत्न हे इतरांना प्रेरणादायी असतील अशाही भावना यावेळी माजी मंत्री दांडेगावकर तथा डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी व्यक्त केल्या. स्वर्गीय राजकुमार नागोबा यंबल यांच्या जीवन चरित्रावर बोलताना उपस्थित मान्यवरांनी यंबल कुटुंबीयांकडून खूप शिकण्यासारखे आहे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे वळत मोठ्या उद्योगांमध्ये भरारी घेत नावलौकिक करण्याचं काम स्वर्गीय राजकुमार नागोबा यांच्या पुण्याईने यंबल कुटुंबियांना मोठे योगदान दिल्याची भावना देखील माजी खासदार शिवाजीराव माने यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी अद्यावत प्रयोग शाळेचे उद्घाटन, पुतळा अनावरण यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन रेशन इंग्लिश स्कूल तथा यंबल कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले असताना शिरड शहापूर सर्कलमधीलच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक मान्यवरांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यावेळी रेसन्स इंग्लिश स्कूलच्या स्टाफ तथा मिलिंद भाऊ मित्र मंडळाच्या वतीने अथक परिश्रम घेतले. तर उपस्थित आमचे संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भाऊ राजकुमार यंबल यांनी आभार मानले