September 8, 2024 12:53 pm

Home » हिंगोली » शिरडशहापूर येथे घंटागाडीचे लोकार्पण; गावातील विविध विकास कामांची पाहणी

शिरडशहापूर येथे घंटागाडीचे लोकार्पण; गावातील विविध विकास कामांची पाहणी

212 Views

गावातील विकास कामे पाहता उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलं कौतुक

शिरड शहापूर -उमेश चक्कर

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे दिनांक 22 फेब्रुवारी रोजी दोन घंटा गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन योजनेअंतर्गत येथील ग्रामपंचायत तर्फे दोन घंटागाडी खरेदी करण्यात आल्या त्याचे लोकार्पण जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी आत्माराम बोंदरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. आर. कुंभार, एमआरई जीएस गटविकास अधिकारी प्रदीप बोंढारे, माजी. जि. प. उपाध्यक्ष मिलिंद यंबल यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मोलाच मार्गदर्शन केलं.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंदरे,
ए. आर. कुंभार, एमआरई जीएस गटविकास अधिकारी प्रदीप बोंढारे यांनी शिरडशहापूर गावातील विविध विकास कामांची पाहणी केली ग्रामपंचायत ने केलेल्या सांडपाण्याची विशेष विल्हेवाट लावल्याने या कामाची देखील उपस्थित अधिकाऱ्यांनी पाहणी करत ग्रामपंचायतने केलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. ग्रामपंचायतच्या वतीने सत्कारही करण्यात आला. सध्या अनेक गावात विकास कामे सुरू असताना साहेब फक्त यावर सह्या करा गावात यायचे काम नाही असे अनेकदा बोलल्या जाते पण येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्याकरता माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांनी आमच्या गावात सुरू असलेली कामे पाहण्याकरता तुम्ही आवर्जून या अशी हाक दिली याविषयी देखील उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यावेळी बोलतांना समाधान व्यक्त केलं. यावेळी सरपंच यशवंत उर्फ जितू रावले, उपसरपंच संभाजी जोगदंड, ग्राम विकास अधिकारी जी. पी. हालबुर्गे, गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची यावेळी उपस्थिती होती. गावात सुरू असलेल्या अभ्यासिकेला देखील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट दिली अभ्यासकेच्या माध्यमातून मागील दोन ते तीन महिन्यात तीन मुले शासकीय सेवेत रुजू झाल्याची माहिती मिळताच त्यांनी अभ्यासिकेतील मुलांचे देखील यावेळी कौतुक केले.

hipravahnetwork
Author: hipravahnetwork

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This