सोड न..रे..! तुला मरायचं का असे म्हणत माजी आमदार रामराव वडकुते आक्रमक
कडती शिवारात कत्तलीसाठी जनावरे नेताना पिकप पकडला
प्रतिनिधी- उमेश चक्कर हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव ते जवळा जाणाऱ्या रोडवर एका पिकप वाहनाद्वारे जनावरे घेऊन जातांना कडतीतील युवकांनी हा पिकअप पकडला. दरम्यान भाजपा नेते तथा माजी आमदार या मार्गावरून जात असताना त्यांनी तात्काळ हे पिकप वाहन थांबवण्यासाठी सांगितले. युवकांनी हा पिकप थांबवण्यासाठी प्रयत्न केले मात्र पिकअप चालक फरार होण्याच्या मार्गावर असतांना भाजपा नेते रामराव वडकुते यांनी चालकास धारेवर धरल्यानंतर हा पिकप थांबवण्यात आला. दरम्यान पिकप मध्ये चार जनावरे नेत असताना हा पिकप कडती शिवारात थांबविण्यात आला असून भाजपा नेते रामराव वडकुते यांनी तात्काळ नरसी पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना कळवले ही जनावरे कुठे नेत होती याची दाखले खरी आहेत का? याची शहानिशा देखील करण्यास माजी आमदार रामराव वडकुते यांनी पोलिसांना सांगितले. तात्काळ नरसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ही जनावरे घेऊन जाणारी पिकप गाडी पोलीस ठाण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. भाजपा नेते रामराव वडकुते शांत संयमी आपण पाहिले पण वेळप्रसंगी आक्रमक सुद्धा झाल्याचं यावेळी दिसून आल आहे