September 8, 2024 12:54 pm

Home » राजकारण » नागेश पाटलांना उमेदवारीची लॉटरी

नागेश पाटलांना उमेदवारीची लॉटरी

221 Views

प्रतिनिधी- उमेश चक्कर हिंगोली

महाविकासआघाडी कडून शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर हे आहेत उमेदवार

मागील अनेक दिवसापासून हिंगोली लोकसभेचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चेला उधान आले होते. राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड आधी महाविकास आघाडी मधील घटक पक्षाकडून उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र हिंगोली लोकसभा मतदारसंघातील संपर्क पाहता त्याचबरोबर हिंगोली लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात असल्याने शिवसेनेला तगडा उमेदवार कोण असेल याविषयी देखील चर्चा होत असताना हिंगोली लोकसभा मतदारसंघातील रहिवासी तथा उमेदवार हा मतदार संघातीलच असावा अशीही मतदारसंघातून मागणी होत असताना सर्व गुणसंपन्न सर्व परिचित असलेले नागेश पाटील अष्टीकर यांना महाविकास आघाडी कडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नागेश पाटील अष्टीकर यांचा मतदार संघात दांडगा संपर्क देखील आहे. शिवसेनेच्या माध्यमातून हादगाव विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार देखील राहिले. गावच्या सरपंच पदापासून अनेक संस्थांच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, पक्षातील जिल्हाप्रमुख पद ते आमदारकीपर्यंत असा मोठा त्यांचा राजकीय प्रवास पाहता पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केल्याचे बोलले जात आहे. त्यांची उमेदवारी जाहीर होतात हिंगोली लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी जल्लोष देखील साजरा करण्यात आला आहे. अनेक जण पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करीत असताना जणूकाही नागेश पाटलांची लॉटरी लागल्याचे ऐकायला मिळत आहे.

या ठिकाणी त्यांचा परिचय तथा त्यांच्या विषयी माहिती खालील प्रमाणे

परिचय

नाव:- नागेश बापूरावजी पाटील आष्टीकर
( शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख नांदेड )

जन्म तारीख:- 27 जुलै 1972
शिक्षण:- एम.कॉम.
ज्ञात भाषा:- मराठी, हिंदी, इंग्रजी
पत्नी:- सौ सुषमा नागेश पाटील आष्टीकर
मुलगा:- कृष्णा नागेश पाटील आष्टीकर
सून:- सौ वैष्णवी कृष्णा पाटिल आष्टीकर
मुलगी:- सौ पूजा श्रीकांत तरोडेकर
संपूर्ण पत्ता:- ह.मु.पोस्ट हदगाव ता. हदगाव जिल्हा नांदेड
पक्ष :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

भूषविलेली पदे:- माजी आमदार हदगाव विधानसभा मतदारसंघ २०१४ ते २०१९
माजी सरपंच:- मौजे आष्टी ग्रामपंचायत (२०००-२००५)
माजी सभापती:- कृषी उत्पन्न बाजार समिती हदगाव (२००५-२०१३)
माजी संचालक:- पुणे पणंन महासंघ (२००२ ते २००७)
माजी सदस्य :- मराठवाडा विद्यापीठ (१९९५-२०००)
माजी तालुका प्रमुख:- शिवसेना हदगाव २०१०-२०१४
संचालक नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक नांदेड २०१६ पासून
माजी सदस्य :- मुख्यमंत्री ग्राम सडक योजना
माजी सदस्य:- अनुसूचित जाती जमाती समिती

विदेश दौरे :- अमेरिका, कॅनडा,बँकॉक, युरोप, इज्राइल,दुबई असे एकूण 17 देश

hipravahnetwork
Author: hipravahnetwork

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This