September 8, 2024 1:00 pm

Home » समाजकारण » हट्टा ठाणेदाराच्या पाठीवर पोलीस अधीक्षकांची कौतुकाची थाप.

हट्टा ठाणेदाराच्या पाठीवर पोलीस अधीक्षकांची कौतुकाची थाप.

199 Views

(प्रतिनिधी-हिंगोली)

हट्टा पोलीस स्टेशनची पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्याकडून वार्षिक तपासणी

हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी नुकतीच 16 मे गुरुवार रोजी हट्टा पोलीस ठाण्यामधील कामकाजाचे निरीक्षण करीत ठाण्यातील कामकाजासंबंधीचा आढावा घेत हट्टा पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी
सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्यासह ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक्य त्या सूचना दिल्या. पोलीस अधीक्षक जी श्रीधर रुजू झाल्यापासून हिंगोली जिल्ह्यात शांतता राहावी, कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहावी यासाठी प्रयत्न केले आहेत जिल्ह्यातील गुन्हेगारांवर आळा बसण्यासाठी ज्या गुन्हेगारावर अनेक गुन्हे आहेत अशांना तडीपार केले आहे. अवैध धंद्याची माहिती मिळाल्यास तात्काळ विशेष पथकाद्वारे कारवाई करणे, एवढेच नाही तर पोलीस कर्मचारी देखील कामात कसूर करीत असेल तर त्याच्यावर सुद्धा कार्यवाही करणे अशा रोखठोक भूमिकेमुळे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांचे नाव चर्चेत आहे. नुकतेच हट्टा पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी कर्तव्यदक्ष पोलीस अध्यक्ष जी श्रीधर यांनी केली यावेळी कामकाजामध्ये गती निर्माण करून अधिकाधिक गुन्हे निकाली काढण्यावर हट्टा पोलिसांनी भर दिल्याने यावेळी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी समाधान व्यक्त केलं. ठाणेदार गजानन बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे परिसरात दररोज केली जात असलेली स्वच्छता, ठाणे इमारत तथा वॉल कंपाऊंड ला केलेली रंगरंगोटी, वॉल कंपाऊंड नजीक केलेली तारकुंपण त्याचबरोबर सण उत्सव काळात तथा मागील झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात सामाजिक सलोखा राखत ठाणे हद्दीतील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लोकसभा निवडणुकीतही उत्तम कामगिरी बजावणाऱ्या ठाणेदार गजानन बोराटे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर निवडणुकीच्या काळात महत्त्वाच्या व्यक्तीच्या दौरा कार्यक्रमाच्या वेळी बंदोबस्तासाठी उत्कृष्ट आखणी करून नियोजन पर बंदोबस्त लावण्या बाबत हट्टा पोलिसांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी पाहता पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी ठाणेदार गजानन बोराटे यांच कौतुक केल. यावेळी ठाणे हदितील सर्व पोलीस पाटील यांना पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या प्रमुख उपस्थितीत सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांनी मार्गदर्शन देखील केलं. ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांची यावेळी बैठक घेण्यात आली यावेळी त्यांनाही यावेळी सूचना देण्यात आल्या. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी ठाण्याची वार्षिक तपासणी करत असताना ठाणेदार व सर्व कर्मचाऱ्यांना देखील यावेळी आवश्यक त्या सूचना दिल्या. कामकाजामध्ये गती निर्माण करून अधिकाधिक गुन्हे निकाली काढण्यावर भर द्यावा असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सण-उत्सव तथा निवडणुकीच्या काळात ठाणे हद्दीत शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी त्यांच्या कामाचं यावेळी कौतुक केलं. यावेळी पोलीस अधीक्षक जी श्रीधर, पोलीस उपविभागीय अधिकारी थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक जाधव, यांच्यासह पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचारी ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांची यावेळी उपस्थिती होती

hipravahnetwork
Author: hipravahnetwork

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This