(प्रतिनिधी- उमेश चक्कर)
डॉ गिरीश तांभाळे यांनी वसमत मध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा केल्या उपलब्ध
वसमत येथे निदान डायग्नोस्टिक सेंटरचा भव्य लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. डॉक्टर गिरीश तांभाळे पाटील यांनी सुरू केलेल्या डायग्नोस्टिक सेंटरमुळे समाधान व्यक्त केल जातेय. या डायग्नोस्टिक सेंटर मध्येअत्यंत प्रगत 96 स्लाईस सिटीस्कॅन, ऍडव्हान्स फाईव्ह डी सोनोग्राफी, कलर डॉपलर, सोनोग्राफी गाईडेड इंटरव्हेंशन, टेली रेडिओलॉजी, सि.टी अंजॉग्राफी याचबरोबर सर्व अवयवांच्या बायोप्सि या सर्व सुविधा आता वसमत शहरात उपलब्ध झाल्या आहेत. नुकताच निदान डायग्नोस्टिक सेंटर लोकरपण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय. वसमत येथील डॉक्टर गिरीश तांबाळे यांनी वसमत मध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध केल्याने वसमतकरांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. आज 18 मे रोज शनिवारी निदान डायग्नोस्टिक सेंटरचा भव्य शुभारंभ उज्वला विजयप्रकाश तांभाळे पाटील, डॉक्टर विजयप्रकाश नारायणराव तांभाळे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला आहे. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी अनेक मान्यवरांनी डॉक्टर गिरीश तांभाळे तथा तांभाळे परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी डॉक्टर गिरीश तांभाळे, डॉक्टर विजयप्रकाश तांभाळे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उज्वलाताई तांभाळे यांनी सर्वांचे आभार मानले.