कार्यवाही करण्यासाठी आलेल्या पथकातील गरम झालेल्या अधिकाऱ्यांनी घेतले थंड कोल्ड्रिंक्स?
हिंगोली जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. या बोगस डॉक्टरांवर कार्यवाही करण्यासाठी तालुकास्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. मात्र या तालुकास्तरीय समितीकडून कार्यवाहीपेक्षा उन्हाळ्याचे दिवस असल्याने थंड कोल्ड्रिंक पीत घरवासी होत असल्याच्या चर्चा सध्या जोरात सुरू असताना आम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी शेळके यांच्याशी संपर्क साधला असता माहिती घेऊन कळवतो असे सांगितले आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील एका ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरवर कार्यवाही करण्यासाठी 29 मे रोजी दुपारच्या सुमारास एका गावात मोजकेच अधिकारी डॉक्टर पाशी गेल्याची माहिती आहे. सदरील डॉक्टर कडे औषधाचा साठा देखील उपलब्ध होता मात्र सदरील त्या डॉक्टरने एका फार्मासिटचे लायसन्स भाडेतत्त्वावर लावल्याचे दिसून आल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. सदरील त्या डॉक्टरकडे एका महाराष्ट्रीयन डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन पॅड आढळून आले आहेत. आता मात्र ज्या प्रिस्क्रीप्शन पॅड त्या बोगस डॉक्टर कडे आढळून आले त्या डॉक्टरची सुद्धा तपासणी करण्यासाठी सदरील वैद्यकीय पथकातील अधिकारी त्या दवाखान्यासमोर जाऊन आल्याची माहिती आहे. एका महाराष्ट्रीयन डॉक्टर आणि एका बंगाली डॉक्टर कडे पथक जाऊन आल्याच्या चर्चेला उधान आलं असताना कार्यवाही होणार की नाही याबाबत अजूनही शंका आहे. याबद्दल सदरील ठाणे हद्दीत येणाऱ्या पोलीस स्टेशन त्याचबरोबर ज्या ठिकाणाहून तपासणीसाठी अधिकारी निघाले त्या हद्दीतील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आम्हाला कुठलीच कल्पना नसल्याचे सांगितले आहे तेथील सीएचओ यांच्याशी देखील संपर्क केला असता त्यांनी मात्र फोन उचलण्यास टाळले आहे.सदरील डॉक्टरवर अगोदरही अनेकदा कार्यवाही झाल्याचे ऐकायला मिळत असतांना आता खरंच कार्यवाही होणार का याबद्दल उलट सुलट चर्चेला उधान आले आहे. यात सर्वात महत्त्वाच म्हणजे उन्हाळ्याचे दिवस असतांना कार्यवाहीपेक्षाही गरम झालेल्या अधिकाऱ्यांनी कोल्ड्रिंक्स घेतल्याची चर्चा मात्र जोरात सुरू आहे. सदरील त्या महाराष्ट्रीयन डॉक्टरचे आणि त्या बंगाली डॉक्टरचे काय कनेक्शन आहे हे मात्र तिथे कोल्ड्रिंक्स घेतलेल्या पथकातिल अधिकाऱ्यांना नक्की ठाऊक असणार आहे.