September 8, 2024 1:02 pm

Home » हिंगोली » तालूका कृषी अधिकारी कार्यालयातील 15 रिक्त पदे भरा – जिल्हाप्रमुख गोपू पाटील

तालूका कृषी अधिकारी कार्यालयातील 15 रिक्त पदे भरा – जिल्हाप्रमुख गोपू पाटील

356 Views

प्रवाह नेटवर्क

कळमनुरी तालुका कृषी अधिकारी पदाबरोबर कृषी सहाय्यक 13 व इतर मिळून 15 रिक्त पदामुळे कामकाज ठप्प होत आसुन सदर रिक्त पदे कषी विभागाने भरून शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत यांनी केली आहे.
कळमनुरी तालुका कषी अधिकारी कार्यालयात तालुका कषी अधिकारी पद मागील एका वर्षांपासून रिक्त आहे. याचप्रमाणे आखाडा बाळापूर कषी पर्यवेक्षक तसेच कळमनुरी, आखाडा बाळापूर, वारंगा त.ना. येहळेगाव तुकाराम,नांदापुर, पोत्रा,डोंगरगावपुल, सालेगाव,चिखली, डोंगरकडा, भोसी,रेडगाव, जवळापांचाळ इत्यादी 13 कषी सहाय्यक पदे प्रदीर्घ काळापासून रिक्त आहेत. रिक्त पदामुळे कामकाज प्रभावित होत आसुन कषी विभाग योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी अडचण येत आहेत. तसेच शेतकऱ्यांना विविध योजना, उपक्रम, माहिती मिळण्यासाठी गैरसोय होत आसल्याने शासनाने व कषी विभागाने सदर रिक्त पदे भरण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत यांनी केली आहे.

hipravahnetwork
Author: hipravahnetwork

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This