December 12, 2024 2:27 am

Home » राजकारण » मिलिंद यंबल यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केली चर्चा

मिलिंद यंबल यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केली चर्चा

157 Views

प्रतिनिधी- प्रवाह नेटवर्क

वसमत विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे नेते मिलिंद यंबल यांनी मागील अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पक्ष संघटन वाढवण्यासाठी काम केलं. मतदार संघातील बूथ प्रमुख, वॉरियर्स, सर्कल प्रमुख, गणप्रमुख तथा छोट्या-मोठ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी त्यांची नाळ जुळली आहे. सध्या ते वसमत विधानसभा मतदारसंघात गावभेट दौरे करीत असेल विविध योजनांची माहिती देत लाभ कशा पद्धतीने घ्यायचा यासाठी सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघात काम जोरात सुरू आहे. सामाजिक उपक्रम नेहमीच राबवित त्यांनी मतदारसंघातच नव्हे तर जिल्हाभरात त्यांचं नाव लौकिक आहे. नुकतेच देशाचे पंतप्रधान (Narendra Modi) नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त निबंध स्पर्धा मिलिंद यंबल यांनी आयोजित केली आहे.
याकरिता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना निबंध स्पर्धेचे पत्रिका देत त्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. यावेळी मिलिंद यमल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बराच वेळ चर्चा केली आहे.

hipravahnetwork
Author: hipravahnetwork

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This