September 8, 2024 12:04 pm

Home » समाजकारण » सौ उज्वलाताई विजयप्रकाश तांभाळे पाटील यांनी आयोजित केलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद

सौ उज्वलाताई विजयप्रकाश तांभाळे पाटील यांनी आयोजित केलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद

45 Views

सौ उज्वलाताई विजयप्रकाश तांभाळे पाटील यांनी आयोजित केलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ उज्वलाताई विजयप्रकाश तांभाळे पाटील यांच्या वतीने वसमत येथील ओम गार्डन मंगल कार्यालय येथे ओवाळणी रक्षाबंधनाची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या रक्षाबंधन कार्यक्रमात उपस्थित बहिणींच्या हस्ते उपस्थित भावांना राखी बांधून हा अनोखा संदेश यावेळी दिला. या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला शेकडोंच्या संख्येने वसमत विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते बूथ प्रमुख, वॉरियर्स, शक्ती केंद्रप्रमुख, सर्कल प्रमुख, सुपर वॉरियर्स, प्रदेशचे पदाधिकारी, जेष्ठ नेते, कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली. भाऊ आणि बहिणी मधील एक अतूट नातं या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या कार्यक्रमात आयोजक सौ उज्वलाताई तांबाळे पाटील यांचं भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी तथा उपस्थित ज्येष्ठ नेत्यांनी उज्वलाताईंच्या पाठीवर या ओवाळणीच्या माध्यमातून जणूकाही कौतुकाची थाप दिली. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सौ. उज्वलाताई विजयप्रकाश तांभाळे पाटील यांच्या वतीने आयोजित केलेला ओम गार्डन मंगल कार्यालय आसेगाव रोड वसमत या ठिकाणी रक्षाबंधन आणि स्नेह भोजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तानाजीराव मुटकुळे, माजी खासदार शिवाजीराव माने, जिल्हा अध्यक्ष फुलाजी मामा शिंदे, ज्येष्ठ नेते के.के.शिंदे, जिल्हा सरचिटणीस खोबरजी पाटील नरवाडे, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश आहेर, जिल्हा उपाध्यक्ष बालाजीराव जाधव, अध्यत्मिक आघाडी अध्यक्ष विनायक महाराज, डॉ् सेल अध्यक्ष अनिल जिंतुरकर, वसमत मंडळ अध्यक्ष अवधूत शिंदे, शहर अध्यक्ष शिवाजीराव अडलींगे, औंढा मंडळ अध्यक्ष सखाराम इंगळे, वसमत महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष निर्मलाताई नादरे, शहर अध्यक्ष शिल्पा महाराज, औंढा मंडळ अध्यक्ष अरूनाताई बिच्चेवर, विठ्ठलनाना भोसले, राधाकिशन साबणे पाटील, सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सर्व पदाधिकारी, बूथ प्रमुख ,शक्ती केंद्र प्रमुख, सर्कल प्रमुख, सुपर वॉरियर्स, शहर व ग्रामीण मंडळ पदाधिकारी , प्रदेश पदाधिकारी,ज्येष्ठ नेते, कार्यकर्ता त्याचबरोबर मतदार संघातून आलेल्या शेंकडों महिलांची यावेळी उपस्थिती होती. उज्वलाताई तांभाळे पाटील यांनी आमदार तानाजीराव मुटकुळे, ज्येष्ठ नेते शिंदे जिल्हाध्यक्ष फुलाजी मामा शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश आहेर यांच्यासह अनेकांना राखी बांधली. या रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त आमदार तानाजीराव मुटकुळे, माजी खासदार शिवाजीराव माने यांच्यासह अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ओवाळणी म्हणून नक्की तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू आणि ही वसमतची जागा भाजपला कशी खेचून आणता येईल यासाठी प्रयत्न करू असा विश्वासही यावेळी दिला. यावेळी सर्व उपस्थितांचे भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा तथा वसमत विधानसभा निवडणूक प्रमुख उज्वलाताई तांभाळे पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

hipravahnetwork
Author: hipravahnetwork

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This