तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.
उमेश चक्कर, हिंगोली
हिंगोलीतल्या आजी-माजी खासदाराच्या फोटोची सध्या चर्चा जोरात सुरू आहे.त्याचं कारणही तसंच आहे एकमेकांना तिळगुळ खाऊ घालतानाचा हा व्हायरल झालेला फोटो आहे. हिंगोलीतल्या एका मंगल कार्यालयात तब्बल 15 पक्षाच्या पदाधिकारी, नेते मंडळी तथा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यावेळी माजी खासदार अँड शिवाजीराव माने यांनी आपल्या भाषणशैलीतून खदखद व्यक्त केली. जणू काही त्यांच्या पोटात गोळा आला की काय अशा चर्चा रंगू लागल्या यावेळी बोलताना माजी खासदार शिवाजीराव माने म्हणाले की मागची पुनरावृत्ती होऊ नये 2021-22 साल हे फार जड गेलं, कुणी इकडे गेलं कोणी तिकडे गेल मागची पुनरावृत्ती होऊ नये हीच माझी इच्छा आहे असे म्हणत आपल्या भाषणशैलीतून विद्यमान खासदारांना त्यांनी टोला लगावला आहे. माजी खासदार शिवाजीराव माने यांनी अगोदर बाळापूरच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला होता त्यावेळेस विद्यमान खासदार, कळवणूरीचे आमदार हे सुद्धा उपस्थित होते त्यानंतर माने यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला मात्र या काळात अनेक घडामोडी घडल्या. दरम्यान हिंगोलीच्या सिंचन प्रश्नावर अनेकदा माजी खासदार शिवाजीराव माने यांनी बोलताना कळमनुरीचे आमदार आणि विद्यमान खासदार यांनाही खडे बोल सुनावले. आज घडीला महायुतीच्या या मेळाव्यात एक-दोन नाही तर तब्बल 15 पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते एकाच व्यासपीठावर आले असले तरी माजी खासदार माने यांनी विद्यमान खासदाराविषयी आपल्या भाषनातून खदखद व्यक्त केली आहे. मागची पुनरावृत्ती नको असे म्हणत जणू काही हाच खासदार नको असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी जुन सगळं काही विसरून जाऊ आणि एकमेकांना तिळगुळ खाऊ घालू असे म्हनत एकमेकांना तिळगुळाचा गोळा भरवला असला तरी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत हेच आजी-माजी एकमेकांना मदत करतील का? याबद्दल आता चर्चा रंगू लागल्या आहेत. मागील दोन ते तीन वर्षात जे जमलं नाही ते एका तिळगुळाच्या गोळ्याने जमेल का हाच मोठा प्रश्न आहे. माजी खासदार ऍडव्होकेट शिवाजीराव माने यांचा तसा लोकसभा मतदारसंघात आजही दांडगा संपर्क आहे. त्यांच्या कार्यकाळात केलेली कामे, त्यांचे कार्यकर्ते तथा चाहते त्यांचा मोठा वर्ग असल्याने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव माने यांना भारतीय जनता पार्टीने संधी द्यावी अशी मागणी सुद्धा लोकसभा मतदारसंघातून केली जात आहे.विद्यमान खासदारांना तिळगुळ खाऊ घातला असला तरी मध्यंतरी केलेला अप्रत्यक्ष विरोध पाहता कार्यक्रमाप्रसंगी केलेल्या भाषण शैलीतून नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळाल आहे.
मागील 14 जानेवारी रोजी हिंगोली शहरातल्या एका मंगल कार्यालयात महायुती मधील 15 पक्षाच्या नेत्यांचा तथा पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा कार्यक्रमाचे आयोजन केले होते यामध्ये तब्बल 15 पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.