September 19, 2024 7:42 am

Home » समाजकारण » अपघातग्रस्तांच्या मदतीला देवदूत डॉक्टर श्रीकांत पाटील धावले

अपघातग्रस्तांच्या मदतीला देवदूत डॉक्टर श्रीकांत पाटील धावले

130 Views

प्रतिनिधी-उमेश चक्कर,हिंगोली

स्वतःच्या गाडीमध्ये नेत हॉस्पिटलमध्ये केले दाखल

सद्यस्थितीत अपघात घडल्यानंतर अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी त्यांचे फोटो काढताना आपण अनेकदा पाहिले; पण अपघात घडल्यानंतर स्वतः गाडी थांबवत अपघातग्रस्तांना स्वतःच्या गाडीत टाकून उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेत त्यांना मदत करण्यासाठी डॉक्टर श्रीकांत पाटील जणू काही देवदूत म्हणूनच धावलेत..

नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव_ तामसा रोडवर भीषण अपघात घडल्याची घटना घडली यामध्ये दोन तरुण गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडल्याचे डॉक्टर श्रीकांत पाटील हे या मार्गावरून जाताना त्यांच्या लक्षात आले. तात्काळ ड्रायव्हरला त्यांनी गाडी थांबवण्यास सांगितले. घटनास्थळी दोन्ही तरुण गंभीर अवस्थेत असताना स्वतःच्या जवळच असलेल्या रुमालाने रक्तस्त्राव थांबावा यासाठी या जखमींच्या डोक्याला रुमाल बांधला. त्यानंतर स्वतः देवदूत डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी स्वतःच्या गाडीत नेत या जखमींना एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. जखमींच्या घरच्यांना देखील माहिती देत त्यांना देखील काळजी करू नका असे म्हणत धीर दिलाय. एवढ्यावरच डॉक्टर श्रीकांत पाटील थांबले नाहीत दोन्ही जखमींची परिस्थिती देखील बेताचीच असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी पुढील इलाज मोफत व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केलेत तर यावेळी देवदूत म्हणून हिंगोलीचे भूमिपुत्र डॉक्टर श्रीकांत पाटील धावल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. आपण सुद्धा अनेक राजकीय नेते पाहिले असतील पण कुठलाही विचार न करता तात्काळ मदतीची भावना डोक्यात आनत तात्काळ मदत करणारा नेता आम्ही पहिल्यांदाच पाहिलाय अशी भावना देखील उपस्थितांनी व्यक्त केली. हिंगोलीचे भूमिपुत्र असलेल्या डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी या अगोदरही हिंगोली लोकसभा मतदारसंघात अनेक कुटुंबियांना मदत केलीये. तर अनेक कुटुंब दत्तक देखील घेतलेत, नेहमीच राष्ट्रप्रेम, देशप्रेम त्याचबरोबर गोरगरीब कष्टकरी याही पलीकडे सांगायचं झालं तर अनेक निराधारांना आधार देणाऱ्या डॉक्टर श्रीकांत पाटील यांच्या कार्याला सलाम.

hipravahnetwork
Author: hipravahnetwork

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This