प्रतिनिधी-उमेश चक्कर हिंगोली
हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर शिरडशहापूर येथील रेसन्स इंग्लिश स्कूल शाळेत कार्यक्रमाप्रसंगी आले असता सेदुरसना येथील गावकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांच्याशी सेदुरसना गावातील विकासात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी श्री नीळकंठेश्वर महादेव मंदिर यासाठी विकास कामासाठी निधी देण्याचे संदर्भात चर्चा झाली. यावेळी माजी चेअरमन वसंतराव चिलकेवार, ईश्वर ढेकळे, धोंडजी शेवाळे, माजी सरपंच उमाजी ढेकळे, नामदेवराव मुधळकर, बालाजी जाधव पाटील, रावसाहेब मामा जाधव, आदींची यावेळी उपस्थिती होती.
शिरडशहापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट
हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी नुकतेच औंढा तालुक्यातील शिरडशहापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात भेट दिली. गावातील रेसन्स इंग्लिश स्कूल येथील कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी पापळकर आले होते. यावेळी ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मिलिंद यंबल, सरपंच यशवंत उर्फ जितू रावले, उपसरपंच जोगदंड पाटील तथा सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी देखील यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांचा सत्कार केला विकासात्मक मुद्द्यावर यावेळी चर्चा देखील झाली.ग्रामपंचायत च्या कामकाजाबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी विचारणा केली. ग्रामपंचायतीच्या कामाबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी समाधान व्यक्त केले.