संवेदनशील मतदान केंद्राच्या ठिकाणची पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्याकडून पाहणी
प्रतिनिधी- उमेश चक्कर हिंगोली
लोकसभा निवडणुका जवळ येत असताना पोलीस प्रशासनाकडून देखील खबरदारी घेतली जात आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर कॅमेऱ्याचे करडी नजर असली तरी येणाऱ्या निवडणुका शांततेत व्हाव्या यासाठी निवडणुक विभाग ज्या पद्धतीने खबरदारी घेततो त्याच पद्धतीने पोलीस प्रशासनाकडून देखील आतापासूनच जिल्ह्यातील संवेदनशील असलेले बुथ तथा ज्या ठिकाणी मतदान होणार आहे अशा संवेदनशील मतदान केंद्राच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी भेटी दिल्या आहेत. वसमत तालुक्यातील किनोळा, औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर, जवळा बाजार, लोहरा आदी ठिकाणी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी भेटी दिल्या आहेत. येत्या काही महिन्यात निवडणुका पार पडणार आहेत त्याच अनुषंगाने सदरील केंद्राच्या ठिकाणी भेटी देत पाहण्याकरिता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाणार आहे यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी संदिपान शेळके, कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम निर्दोडे, वसमत ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे, हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, औंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश राहिरे यांचेही यावेळी उपस्थिती होती.