शेतकऱ्यांचे कैवारी अजित मगर यांनी शेतकऱ्यांना खरीप पीकविमा मिळावा यासाठी केलेल्या उपोषणास आले यश
हिंगोली- उमेश चक्कर,हिंगोली
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीकविमा मिळावा यासाठी शेतकरी तथा शिवसेना नेते अजित मगर यांनी 3 दिवस उपोषण केले होते, त्यात पीकविमा कंपनी ने ज्या शेतकऱ्यांनी दावे दाखल केले, त्यांना नुकसान भरपाई मिळणे चालू झाले आहे, अग्रीम रक्कम मिळाली नसल्याने शेतकऱ्यांची मोठी पंचायत झाली होती, शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असताना पीकविमा मिळणे अपेक्षित होते परंतु प्रशासनाच्या हलगर्जी पणाने पीकविमा मिळाला नव्हता यासाठी अजित मगर यांनी न्यायालयात धाव घेऊन उच्च न्यायालयच्या संभाजी नगर खंड पिठात याचिका दाखल केली होती, याचा परिणाम म्हणून दावे दाखल केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात भरपाई रक्कम येणे चालू झाले यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, यापुढेही अग्रीम पिक विमा मिळावा यासाठी न्यायालयीन लढा चालू राहिल असे अजित मगर यांनी सांगितले, शेतकऱ्यांना हक्काचा अग्रीम पीक विमा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत.