कु.खुशी सेलुकर हिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
प्रतिनिधी -उमेश चक्कर हिंगोली
लष्करी सेवेत दाखल होण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. शालेय जीवनापासून काही पालक आपल्या मुलांना शालेय वयातच सैनिकी शाळेत दाखल करतात. लष्करी सेवेत दाखल होण्याकडे मुलींचाही कल वाढत असल्याचे दिसून आल आहे. वसमत येथील नामांकित असलेले डॉक्टर बालासाहेब सेलूकर यांची मुलगी खुशी बालासाहेब सेलूकर हिने नुकत्याच भारत सरकार मार्फत झालेल्या देशपातळीवरील परीक्षांमध्ये देशभरातून तिसऱ्या क्रमांकाचा बहुमान मिळवलाय, खुशी सेलुकर हिने 400 पैकी 388 गुण मिळवल्याने सर्व स्तरातून खुशी सेलुकर हीच कौतुक केलं जातंय. ऑल इंडिया सैनिकी स्कूल इंटरन्स एक्झामिनेशन 2024 च्या झालेल्या परीक्षांमध्ये देशभरातून भारत सरकार मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये खुशी सेलुकर हिने मॅथेमॅटिक्स मध्ये तब्बल 200 पैकी 200 गुण तर एकूण 400 गुना पैकी 388 गुण मिळवून देशभरात तिसऱ्या क्रमांकावर खुशी डॉक्टर बालासाहेब सेलूकर हिने नाव कमावल्याने सर्व स्तरातून खुशी सेलुकर हिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. बालाजी असोले सरांनी मला मोलाचं मार्गदर्शन केल्याची प्रतिक्रिया देखील यावेळी खुशी सेलुकर हिने व्यक्त केली.
खुशी डॉक्टर बालासाहेब सेलूकर हिने देशभरातून मुलींमध्ये तिसऱ्या क्रमांकावर मिळवलेल्या घवघवीत यशामुळे तिला आता देशभरातील नामांकित सैनिकी शाळेत प्रवेश मिळणार असून खुशी सेलुकर स्वप्न आता मात्र लवकरच पूर्ण होणार आहे.