September 19, 2024 7:15 am

Home » हिंगोली » उत्कृष्ट कामगिरी करीत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या ठाणे हद्दीत झन्ना मन्ना जुगारावर कार्यवाही

उत्कृष्ट कामगिरी करीत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या ठाणे हद्दीत झन्ना मन्ना जुगारावर कार्यवाही

193 Views

हिंगोली- प्रतिनिधी

नुकतेच हिंगोली जिल्ह्यातील तेरा पोलीस स्टेशन पैकी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन पोलीस स्टेशनला प्रशस्तीपत्रक देण्यात आले यामध्ये कुरुंदा पोलीस स्टेशन यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. उत्कृष्ट कामगिरी केल्याने नुकतेच कुरुंदा पोलीस स्टेशनला प्रशस्तीपत्र देण्यात आले मात्र याच पोलीस स्टेशन हद्दी नजीक असलेल्या मोजे पर्जना शिवारात कालव्याचे बाजूस लिंबाच्या झाडाखाली मागील काही दिवसापासून जुगाराचा अड्डा सुरू होता, हीच माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली पण स्थानिक पोलिसांना का मिळाली नसावी हा संशोधनाचा विषय आहे. स्थानिक पोलिसांना या जुगार अड्ड्याची माहिती नसल्याने हीच माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर लागलीच पर्जना शिवारात सुरू असलेल्या झन्ना मन्ना जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कार्यवाही केली आहे. येथे लिंबाच्या झाडाखाली गोलाकार बसून पत्त्यावर पैसे लावून झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असताना चार आरोपी आणि आठ हजार रुपयाचा मुद्देमाल दाखवत केलेल्या कार्यवाहीची चर्चा जोरात सुरू आहे. हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस हवालदार बाबर, पोलीस हवालदार पोकळे, पोलीस शिपाई काळे, पोलीस शिपाई गणेश लेकुळे यांनीही कार्यवाही केली आहे. नुकतेच प्रशस्तीपत्र मिळालेल्या ठाणेदाराच्या हद्दीत जुगार छोटा असो की मोठा असो यांना खरंच माहिती नव्हता का? जी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला ही कार्यवाही करावी लागली याची चर्चा जोरात सुरू आहे.

hipravahnetwork
Author: hipravahnetwork

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This