September 19, 2024 7:09 am

Home » हिंगोली » सेनगावच्या कृउबा समितीच्या संचालक, सभापतीमध्ये पैशावरून राडा?

सेनगावच्या कृउबा समितीच्या संचालक, सभापतीमध्ये पैशावरून राडा?

253 Views

सभापती ठेंगल यांच्यासोबत शाब्दिक वाद करून पैशाची मागणी

परस्पराविरुद्ध दुसरा गुन्हाही दाखल झाल्याने बाजार समिती चर्चेत.

(प्रतिनिधी-हिंगोली)

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर महिन्याला दोन लाख रुपये का देत नाही या कारणावरून सभापतीस मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. ज्यामध्ये बाजार समितीच्या एका संचालकासह बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा याच प्रकरणात बाजार समितीचे संचालक वैभव रामराव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत सभापती अशोक ठेंगल याने तु मला पाच लाख रुपये दिले नाही तर तुझे संचालक पद रद्द करतो असे म्हणत अश्‍लिल भाषेत शिवीगाळ केली तसेच पेपपरवेट व थापड बुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने सेनगाव पोलिसात सभापती अशोक दगडूजी ठेंगल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी एकमेकांविरोधात केलेल्या तक्रारीमुळे जिल्ह्यात सेनगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची चर्चा जोरात सुरू झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 24 मे रोजी दुपारच्या सुमारास सभापती अशोक दगडूजी ठेंगल हे आलेले असताना त्यांना बाजार समितीचे संचालक वैभव रामराव देशमुख यांनी तू आमच्यामुळे सभापती झाला असून प्रत्येक महिन्याला दोन लाख रुपये आम्हाला का देत नाही या कारणावरून सभापती ठेंगल यांच्यासोबत शाब्दिक बाचाबाची करून पैशाची मागणी केली. त्यानंतर आरोपींनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात गोंधळ घालून सभापती ठेंगल यांना शिवीगाळ केल्यानंतर थापडबुक्याने मारहाण करण्यात आली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने सेनगाव पोलिसात सभापती अशोक ठेंगल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैभव रामराव देशमुख, यांच्यासह तब्बल 12 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष तांबे हे करीत आहेत. दरम्यान, याच प्रकरणात संचालक वैभव देशमुख यांनी शुक्रवारी रात्री उशीरा सेनगाव पोलिस ठाण्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैभव रामराव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत सभापती अशोक ठेंगल याने तु मला पाच लाख रुपये दिले नाही तर तुझे संचालक पद रद्द करतो असे म्हणत अश्‍लिल भाषेत शिवीगाळ केली तसेच पेपपरवेट व थापड बुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने सेनगाव पोलिसात सभापती अशोक दगडूजी ठेंगल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुभाष चव्हाण हे करीत आहेत. बाजार समितीमध्ये झालेल्या मारहाणीची मात्र चांगलीच चविष्ट चर्चा रंगत आहे. यात सर्वात महत्त्वाचा म्हणजे खरंच पहिला तक्रारदार यांच्याकडे दर महिन्याला दोन लाख रुपयेची मागणी केली होती का ?त्याचबरोबर दुसरी जी तक्रार दिली त्या तक्रारीत सुद्धा सदरील व्यक्ती संचालक पद रद्द करण्यासाठी खरंच पैसे मागत होता का हे मात्र येत्या काळात पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे.

hipravahnetwork
Author: hipravahnetwork

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This