श्रीमती एम.एस. अर्चना यांच्याकडे वसमत, कळमनुरी, हिंगोली तर एम. पी. मारोती यांच्याकडे उमरखेड, किनवट आणि हदगाव विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १८व्या लोकसभेसाठीच्या मतदानाची निवडणूक प्रक्रिया पार पडली असून, मंगळवारी (दि.४) सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. १५- हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून श्रीमती एम. एस. अर्चना आणि एम. पी. मारोती यांची विशेष मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला मंगळवार, दि. ४ जून रोजी सकाळी ८ वाजता सुरुवात होणार असून, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया लिंबाळा मक्ता येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात होणार आहे.
९२- वसमत, ९३-कळमनुरी आणि ९४ – हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या विशेष मतमोजणी निरीक्षक म्हणून श्रीमती एम. एस. अर्चना या काम पाहणार असून, ८२- उमरखेड, ८३- किनवट आणि ८४ हदगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी एम. पी. मारोती यांच्या निरीक्षणाखाली होणार आहे. श्रीमती अर्चना यांच्या संपर्क अधिकारी म्हणून विभागीय वन अधिकारी श्रीमती पुष्पा पवार (७५८९२१०३०६) व ए.सी.एफ. वन अधिकारी सुनील शिंदे (९४०५६१९८२८) हे या कालावधीत त्यांच्यासोबत राहणार आहेत. तर मतमोजणी निरीक्षक एम. पी. मारोती यांचे संपर्क अधिकारी म्हणून उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी शशीकिरण उबाळे (९७६३७२६९९५) हे त्यांच्यासोबत असतील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.
१५-हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी २६ एप्रिल रोजी म्हणजेच दुस-या टप्प्यात मतदान पार पडले होते.