72 Views
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथील सारंगवाडी माळरानावर असलेल्या सारंग स्वामी महाराजांची संजीवन समाधी आहे या माळरानावर मागील शेकडो वर्षापासून ची यात्रेची परंपरा आजही कायम आहे या यात्रेचा वैशिष्ट्य म्हणजे या दरम्यान अनेक पालेभाज्या एकत्रित करून भल्या मोठ्या कढईमध्ये शिजवीत येथे भाजीचा महाप्रसाद भक्तांना दिला जातो यंदाही उद्या 17 जानेवारी रोजी भाजीचा महाप्रसाद होणार आहे या भाजीच्या महाप्रसादाची तयारी देखील केली जात आहे मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या भाजीच्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे