Home » Uncategorized » सारंग स्वामी यात्रेत लक्ष्मीकांतभैय्या नवघरे यांचा सत्कार; महाप्रसादाच्या ठिकाणीही दिली लक्ष्मीकांत भैय्यांनी भेट

सारंग स्वामी यात्रेत लक्ष्मीकांतभैय्या नवघरे यांचा सत्कार; महाप्रसादाच्या ठिकाणीही दिली लक्ष्मीकांत भैय्यांनी भेट

139 Views

महाप्रसाद भाजीच्या ठिकाणी दिली लक्ष्मीकांतभैय्या नवघरे यांनी भेट

प्रतिनिधी- शिरडशहापूर

वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांचे बंधू लक्ष्मीकांतभैया नवघरे यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर पासून जवळच असलेल्या श्री सारंग स्वामी यात्रेत भेट दिली.यावेळी श्री प्रभूलिंग शिवाचार्य महाराज यांनी लक्ष्मीकांतभैय्या नवघरे यांचा सत्कारही केला.532 वर्षापासूनची भाजीच्या महाप्रसादाची परंपरा असल्याने या यात्रेला फार मोठे महत्त्व आहे.या दरम्यान कच्च्या पालेभाज्या शिजवून रुचकर आणि चविष्ट भाजी बनवली जाते आणि हाच प्रसाद महाप्रसाद म्हणून भक्तांना दिला जात.या महाप्रसाद भाजीच्या ठिकाणी सुद्धा लक्ष्मीकांतभैया नवघरे यांनी भेट दिली. यावेळी विश्वस्त समितीच्या वतीने तथा गावकऱ्यांच्या वतीने लक्ष्मीकांतभैय्या नवघरे यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य आहेर, बापू लांडगे, विजय रावले ज्ञानेश्वर बोंगाने रिंकू बोंगाणे त्याचबरोबर,गवलेवाडी शिरडशहापूर तथा पंचक्रोशीतील शेकडो जणांची यावेळी उपस्थिती होती. उपस्थितांचे लक्ष्मीकांतभैय्या नवघरे यांनी सर्वांचे आभार मानले.

hipravahnetwork
Author: hipravahnetwork

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This