हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाला उमेदवारी मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्ते मध्ये नाराजीचा सूर दिसू लागला आहे. मागील अडीच ते तीन वर्षापासून सतत देश प्रेम राष्ट्रप्रेम म्हणत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघात प्रत्येक गावागावात रामदास पाटील सुंमठाणकर यांच्या नावाची चर्चा होत असताना नोकरी सोडून पक्षासाठी दिवस-रात्र एक करत लोकसभा मतदारसंघात राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणे पक्षातील स्थानिक चे कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय साधक पक्षाच्या माध्यमातून गोरगरिबांची कामे करणे, पक्षातल्या वॉरियर्स, बूथ प्रमुख, सर्कल प्रमुख आदी छोट्या मोठ्या पदाधिकाऱ्यांना मान सन्मानाची वागणूक देणे. अडचणीच्या वेळी एका फोनवर तात्काळ मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहणे आदी बाबीवरून मागच्या अडीच ते तीन वर्षात रामदास पाटील सुमठाणकर या नावाची लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावागावात नावलौकिक झालं असताना आता मात्र शिवसेना शिंदे गटाला उमेदवारी मिळाल्यानंतर रामदास पाटील सुंमठाणकर यांना सपोर्ट करत तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार करावा अशा पोस्ट सोशल माध्यमातून व्हायरल होत आहेत आम्ही कार्यकर्ते आपल्या सोबत आहोत असा देखील या व्हायरल पोस्टमध्ये लिहिलेलं असून आता मात्र रामदास पाटील सुंमठाणकर कोणता निर्णय घेतात यावर मात्र चर्चेचा विषय बनला आहे. सदरील पोस्टही सोशल माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रवाह या पोस्टची पुष्टी करीत नाही.
रामदास पाटील तुम्ही अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार करा! आम्ही तुमच्या पाठीशी, पोस्ट व्हायरल
- hipravahnetwork
- March 29, 2024
- 11:19 pm
- No Comments